मुंबई : संभाजी ब्रिगेडनेता राजकीय क्षेत्रात उडी घेतली आहे. वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात 'संभाजी ब्रिगेड' या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पक्षाचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी प्रसार माध्यमांसमोर संभाजी ब्रिगेड पक्षाची घोषणा केली. यावेळी प्रवक्ते गंगाधर, शिवानंद आतुणे, मुंबई कार्याध्यक्ष अजय यादव आणि राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थितीत होते.


संभाजी ब्रिगेड राज्यात मुंबईसह होणाऱ्या आगामी 18 महानगरपालिका निवडणुका लढवणार आहे. दरम्यान, पुण्यामधील भांडारकर संस्थेवर केलेले आंदोलन, रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविण्याचे आंदोलन, लालमहल येथील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्याबाबत आंदोलन आदी वादग्रस्त आंदोलनांमुळे  संभाजी ब्रिगेडची चर्चा झाली.